महाविद्यालयातील कुस्ती खेळाडूस शस्त्रक्रियेस आर्थिक मदत
महाविद्यालय परिसरात कुस्ती हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. महाविद्यालयातून अनेक विद्यार्थ्यांनी कुस्ती खेळामधून राष्ट्रीय स्तरावर सहभागी झाले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ.के. के. एस. चौगुले आण्णा यांनी कुस्ती खेळाला प्रोत्साहन दिले आहे. यासाठी संस्था वर्धापण दिनी भव्य असे कुस्ती मैदान भरवलं जातं. या खेळामुळे विद्यार्थ्यांचे शारिरीक आरोग्य सुद्धा चांगले राहते. हा खेळ विद्यार्थ्यांनी खेळाला पाहिजे व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपल्या महाविद्यालयाचे मोठे केले पाहिजे असे मत डॉ. के. के. एस. चौगुले (आण्णा) याचे होते.
त्यामुळे महाविद्यालयातील इयत्ता 12 वी आर्ट्स विभागाचा विद्यार्थी सनी धर्मेंद्र पाटील (रा. तेलवे) कुस्ती खेळताना त्याच्या उजव्या पायाला दुखापत ( ligament ) झाली. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रि ये साठी त्याला 150000/- (दीड लाख ) रुपये इतका खर्च आला. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याचे समजताच महाविद्यालय परिवारातर्फे त्याला 21,000/- रुपयांची मदतीचा धनादेश देऊन सहकार्य केले.
यावेळी धर्मेद्र पाटील, संस्था सचिव शिवाजीराव पाटील ,प्राचार्य डॉ.वंदना पाटील, डॉ. उषा पवार, डॉ. बी एन रावण, डॉ. यु. एन. लाड, प्रा. एस.पी. कुंभार ,प्रा.आर.बी.पाटील.प्रा. ए.आर. महाजन ,श्री. बबन चौगुले आदी उपस्थित होते.