Conference and Workshop

 

ONE DAY MULTIDISCIPLINARY NATIONAL LEVEL CONFERENCE ON

GLOBAL STRATEGIES FOR A RESILIENT AND SUSTAINABLE POST PANDEMIC WORLD TOWARDS A BETTER FUTURE

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग स्तब्ध झाले होते तेव्हा शिवाजी विद्यापीठांमधील प्राध्यापक,संशोधक विद्यार्थ्यांनी या व्हायरसवर संशोधन करून लस तयार करण्यामध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान दिले. अमेरिकन भारतीय कंपन्यांनी एक ते तीन करोड पर्यंत निधी उपलब्ध करून दिला त्यातून लस निर्माण केली इतरही नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट राबविले हे जगभर स्वीकारले गेले कोरोना प्रतिबंधक स्प्रेची निर्मिती भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी करून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देखील शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक जगभर केला त्यामुळे शिवाजी विद्यापीठाला अनेक पुरस्कार मिळाले असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी केले.

 श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली, ता.पन्हाळा येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सायन्स विभाग आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीनंतर एका चांगल्या भविष्याच्या दिशेने लवचिक आणि टिकाऊ जगासाठी जागतिक धोरणे " या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शन करताना डॉ. पी. एस. पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा. डॉ.अजय चौगुले होते.

चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात बोलताना डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले कोरोना नंतर प्रचंड आर्थिक उलथापालथ झाली. लोकसंख्येच्या मानाने डॉक्टर उपलब्ध झाले नाही.आज प्रत्येक जिल्ह्यात एका सरकारी हॉस्पिटलची गरज आहे प्रत्येक गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे. स्वच्छ पुरेसे पिण्याचे पाणी, योग्य आहार आणि व्यायाम हे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवून या व्हायरस पासून बचाव केला पाहिजे.

चर्चासत्राच्या तिसऱ्या सत्रात बोलताना डॉ..एम. गुरव म्हणाले कोरोना नंतर उज्वल भविष्यासाठी योग्य व्यूहरचना स्वीकारण्याची गरज आहे. कोरोना काळात झालेला आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी काही मूल्य जोपासण्याची गरज आहे काळानुसार कौशल्य तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.

चर्चासत्राच्या चौथ्या सत्रात एकुण  ७४  शिक्षक, संशोधकविद्यार्थी - विद्यार्थिनीनी आपल्या संशोधन पेपरचे वाचन केले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव मा. शिवाजीराव पाटील, संचालक सौ. वेदिका चौगुले,प्र. प्राचार्य डॉ. श्रीमती व्ही. पी. पाटील, सायन्स विभाग प्रमुख चर्चासत्र समन्वयक श्रीमती एस. एम. चौगुले, आय. क्यु..सी. समन्वयक डॉ. बी. एन. रावण होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी.एन.रावण यांनी केले, पाहुण्यांची ओळख श्रीमती एस. एम. चौगुले यांनी केली, आभार श्री..एस.कुंभार यांनी मानले तर स्वागत सूत्रसंचालन श्रीमती आर.बी.जाधव यांनी केले.

कार्यक्रमास विविध राज्यातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Conference / Workshop Title Level Publication 
ONE DAY MULTIDISCIPLINARY NATIONAL LEVEL CONFERENCE ON GLOBAL STRATEGIES FOR A RESILIENT AND SUSTAINABLE POST PANDEMIC WORLD TOWARDS A BETTER FUTURE National  Paper Publication

One Day State Level Conference on Psychosocial Health

State  
One Day Workshop on Intellectual Property Right College  
One Day National Seminar on Democracy National   
International e - Conference on Women Empowerment  International  
One Day State Level Workshop on Research Methodology State  
Skill Development Enterpreneurship State level Workshop State  
IPR Workshop College  
One day Multidisciplinary National Conference  State  
Institution level Innovation Competion College  
Online National Workshop on Research Methodology National  
International Conference International  
National Conference National  

 

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry