लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र

लोकशाहीर आण्णाभाउचा जन्म 01ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका येथील वाटेगाव या गावांमध्ये मातंग समाजाच्या कुटुंबात झाला होता. आईचे नाव वाळूबाई साठे व वडिलांचे नाव भाऊराव साठे असे होते. अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे उर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे होते. ब्रिटिश काळामध्ये मातंग समाज हा एक गुन्हेगारी समाज , तमाशात काम करणारा समाज म्हणून ओळखला जायचा . मातंग  समाजातील गरीब कुटुंबामध्ये  त्यांचा जन्म झाला. साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचे योगदान दिले . तत्कालीन समाजातील जातीप्रथेबद्दल तीव्र विरोध केला. सर्वसामान्य गरीब दलित बहुजन वर्गांच्या उद्धारासाठी आयुष्यभर आपल्या लेखन साहित्यातून जनजागृती व प्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी केले. समाजातील भेदभावामुळे व जाती प्रथेमुळे त्यांना इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण घेता आले. चौथी पुढील  शिक्षण घेता आले नाही कारण समाजातील जातीभेद .त्यांनी. 1931 मध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांनी चालत सातारा ते मुंबईला स्थलांतर केले.  ते मुंबईला आली तेव्हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी सुरुवातीला विविध ठिकाणी नोकरी केल्या. गिरणी कामगार म्हणून देखील त्यांनी काम केले होते.

त्यांची साहित्य संपदा जर विचारात घेतली तर त्यांनी मराठी भाषेत एकूण 35 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत.  15 लघुकथा संग्रह व त्यांच्या 12 पटकथा, एक नाटक, रशियातील प्रवास लेखन व मराठी पोवाडे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या 27 लघुकथा व अमराठी भाषेत रूपांतरित झालेले आहेत. मराठी पोवाडा त्यांनी रशियन देशापर्यंत पोहोचवला .त्यांच्या लिहिलेल्या लावणी मध्ये लोककथांचा समावेश आहे. त्यांच्या फकीरा या कादंबरीस राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला ही कादंबरी 1959  साली लिहिली . कथेतील फकीरा नावाचा धडक भरवणारा तरुण ब्रिटिश राजवटीमध्ये आपल्या समाजाच्या न्यायासाठी  कसा ब्रिटिशांविरुद्ध लढा देतो त्याचबरोबर दलित समाजातील उपासमारी पासून वाचवण्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध तो कसा बंड पुकारतो त्याचे सखोल वर्णन अण्णाभाऊंनी आपल्या शब्द रूपाने केले आहे. कादंबरीचा शेवट  ब्रिटिश अधिकाऱ्यांनी फकीराला अटक केली जाते आणि फकीरास अखेर फाशी देऊन ठार मारण्यात येते.अशा पद्धतीचे वर्णन अत्यंत वास्तववादी पद्धतीने केलेले दिसते. लावणी या साहित्य प्रकाराला समाज मान्यता व  लोकाश्रयाचा दर्जा मिळवून दिला. लावणी म्हणजे अश्लीलता  ही ओळख त्यांनी पुसून टाकली.

ज्यावेळेस अण्णाभाऊ मुंबईमध्ये होते त्यावेळेला मुंबई गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला व त्या ठिकाणी जोपर्यंत भारतातील सर्व दलित ,बहुजन वर्गास अन्न पाणी मिळत नसेल तर अशा अवस्थेमध्ये स्वातंत्र्य मिळणे हे निरर्थक आहे.  1944 मध्ये अमर शेख शाहिराच्या सोबत त्यांनी लालबाव टा कलापथक स्थापन केले भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन  मान्य नाही म्हणून त्यांना 16 ऑगस्ट1947 रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचासह मोर्चा काढला आणि घोषणा दिली 'ये आजादी झुटी है भारत की जनता भुखी है!' त्यांच्या संपूर्ण लेखन शैलीवर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव जाणवतो

स्वातंत्र्य हे कोणासाठी आहे हे फसवे आहे असे त्यांचे मत होते . कारण बहुजन वर्गातील कष्टकरी वर्गातील लोकांना अन्न पाणी मिळत नाही.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये त्यांनी भाषिक विभागातून वेगळी मराठी भाषा राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनुसार दलित कार्याकडे दलितांच्या उद्धारासाठी व कामगारांच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी त्यांच्या कथासंग्रहाचा त्यांनी वापर केला. बॉम्बे मध्ये स्थापन केलेला पहिला दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी म्हटले की पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून दलित व कष्टकरी कामगार लोकांच्या तळहातावर उतरली आहे. त्यांचे जीवनावर मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव जाणवतो.  त्यांच्यामते दलित लेखकांनी दलितांवरील अत्याचार व समाजातील पिढीजात अनिष्ट परंपरा व त्यावर श्रद्धां नष्ट  करण्यासाठी साहित्य निर्मिती प्रबोधन करावे.

ज्यावेळेस ते रशियाला गेले तेथील अनुभवावर आधारित माझा रशियाचा प्रवास हे वर्णन लेखन त्यांनी केले..

महाराष्ट्रातील विद्यापीठात अण्णाभाऊंच्या साहित्यावर आधारित अकरा प्रबंध पूर्ण आहे पुणे विद्यापीठात त्यांच्या नावाने अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. त्यांची एकूण 22 भाषेत साहित्य अनुवादित झालेले आहे. याचबरोबर लोकनाट्य, चित्रपट लावण्या संदर्भात त्यांचे साहित्य लेखन आहे. त्यांनी अनेक कथांवर आधारित चित्रपट प्रसिद्ध आहेत त्यांची सर्वात गाजलेली लावणी त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांचे रशियन भाषेमध्ये आणली आहे त्यासाठी रशियन सरकारकडून सन्मानित करण्यात आलेले आहे. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचे साहित्य एक अनमोल ठेवा एक रत्न म्हणून पाहिले आहे. त्यांच्या साहित्यामधून त्यांची निरीक्षण शक्ती देखील अतिशय सूक्ष्म आहे.

लेखन शैलीमध्ये मराठमोळा , रांगडापणा, लोभसपणा जाणवतो महाराष्ट्राची ओळख जगापर्यंत नेण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य कृतीतून झालेले दिसते. सन 1985 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली गेली त्या मार्फत मातंग व दलित समाजातील गरीब होतकरू तरुणांना रोजगार निर्मितीसाठी किंवा उद्योग उभारणीसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.त्याचबरोबर घरकुल निवास योजना देखील कार्यरत आहे बरोबर विविध प्रकल्प ,योजना या मंडळामार्फत उपलब्ध आहेत.त्याचबरोबर अण्णा भाऊंच्या नावे खास चार रुपये टपाल तिकीट जारी करून पोस्ट खात्याने त्यांचे स्मरण केलेले आहे.

त्यांचे पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक व कुर्ला येथील उड्डाणपूल सह इमारतींची नावे त्यांच्या नावावर आहेत. असे थोर समाज सुधारक, साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन 18 जुलै 1969 मध्ये गोरेगाव मुंबई येथे झाला. त्यांच्या साहित्य संपेतेचा विचार करता अण्णाभाऊंना पुरस्काराने सन्मानित करणे ही आजच्या या त्यांच्या जयंतीनिमित्त ची खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल असे मला मनोमन वाटते व अण्णांचे विचार इथून पुढील समाजामध्ये रुजवणे, दलितांमधील शिक्षणाचा प्रसार करणे हे त्यांचे राहिलेले स्वप्न सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ठरेल असे मला वाटते.

प्रा. हरिशचंद्र शिरसट

सहा. प्राध्यापक, इंग्रजी विभाग

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry