शिवरायांचा आवडता हेर वीर शिवा काशीद

शिवरायांचा आवडता हेर : वीर शिवा काशीद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ अशीकाहीनवरत्नेहोती की, ते जीवास जीव देणारे होते .त्यामधीलएक रत्न 'शिवा न्हावी' होय .शिवा न्हावीयाचे मूळ आडनाव काशीद होते. त्याचे मूळ गावपन्हाळाच्या पूर्वेस एक मैलावर नेबापूर हे होय . नेबापूर हे गाव सन १४७३ मध्ये नभी बहामनी याने वसवल्याची नोंद बॉम्बे गॅझेटियरमध्ये आहे.या गावात पूर्वापार चालत आलेल्या घराण्यात पाटील कदम व काशिद ही तीन जुनी घराणी आहेत. त्यामधील काशीद घराणे मूळचे नेबापूरचे आहे नाभिक हा त्याचा पिढीजात धंदा होय. त्यांच्या बोलण्यात चतुराई असते . बोलत बोलतइतरांच्या मनातील विचार काढून घेण्यात हे लोक तत्पर असतातसन १६६० मध्ये सिद्दी जोहरच्या वेढाच्या वेळी छत्रपतीशिवरायांच्या गुप्तहेर खात्यात शिवा काशीद सामील झाला होता

गुणसंपन्नता :

शिवा काशीद हा एक विश्वासू सरदार होता . दिसायला तो हुबेहूब शिवाजी राजांच्यासारखा होता. प्रामाणिकपणा, धाडसी वृत्ती आणि कर्तव्य तत्परता अंगी असलेला शिवा काशीद नेहमीच शिवाजी राजांच्याजवळ असायचा. छत्रपती  शिवाजी महाराजांनी अशा अनेक गुणसंपन्न  माणसांचा समुदाय निर्माण केला होता .शिवा काशीद व राजे यांच्यात इतके साम्य होते की, सामान्य माणसांना कोण राजे आणि कोण शिवा काशीद हे ओळखू यायचे नाही.हाती तलवार न घेताही स्वराज्य उभारणीच्या यज्ञ कुंडात असामान्य धैर्य गाजवून स्वामीवरील निष्ठेसाठी आपल्याप्राणाची आहुती देणारा शूरवीर म्हणजे वीर शिवा काशीद. महाराजांच्यासाठी मृत्यूला कवटाळण्यास तयार झालेला एक.सामान्य माणूस होय .

पन्हाळगडाचा वेढा :

शिवरायाच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले . त्यामध्ये अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावरील छापा , सुरतेची लूट इत्यादी प्रसंगातून महाराज  निभावून गेले ते केवळ जीवास जीव देणाऱ्या सवंगड्यामुळेच होय . यापैकी एक कठीण प्रसंग म्हणजे पन्हाळगडाचा वेढाहोय . सिद्धी जोहार ने पन्हाळगडास वेढाचार महिने दिला होता .पाऊस-पाणी-थंड़ी या कोणत्याच गोष्टीचा वेढ्यावर काहीच  फरक पडत नव्हता . गुप्त बातम्या महाराजांना गडावर पोहचत होत्या . पण वेढा उठण्याची काही चिन्हे दिसत नव्हती . तेव्हा महाराजांनी वेगळ्या पध्दती अवलंब केला. ते पन्हाळगड ते विशाळगड मार्गाची चाचपणी करण्यास गुप्तहेर पाठवले . गंगाधर पंतांना सिद्दीजोहर बरोबर वाटाघाटी करण्यास सांगितले .सिद्दीला किल्ला देण्याचा राजांचा निरोप कळविण्यात आला .

प्रत्यक्षात १२ जुलै १६६० रोजी रात्री ७.०० पर्यंत वाटघाटी चालू होत्या. तत्पूर्वी नेताजी पालकर बाहेरूनवेढ्यावर  हल्ले करतील, असे शिवरायांना वाटले .मात्र नेताजीचा कुठे पत्ताच नव्हता . दुसरे असे की, शाहिस्तेखान पुण्याच्या लाल महालात तळ देऊन स्वराज्याची नासाडी करत होता .स्वराज्यावर चोहोबाजूनी संकट कोसळले होते. ही कोंडी फोडण्यासाठी शिवरायांनी सदर--महाल या ठिकाणी बसून विचार विनमय केला. 'राजे उद्या भेट घेणार आहेत' या आशयाचे पत्र गंगाधरपंतानी सिद्दीजोहरकडे पाठविले .तेव्हा वेढ्यात थोडीशी ढिलाई आली . सिद्दी गाफील राहिला. सिद्दी जोहार च्या गोठात आनंद झाला . छत्रपती शिवाजी महाराज बिनशर्त शरणागती स्विकारतात. म्हटल्यावर सिद्दीजोहरला स्वर्ग दोनबोटे उरला .मात्र ईकडे महाराजांनी वेगळा बेत रचला होता. पन्हाळगडाहून विशाळगडाकडे जाण्याचानिर्णय घेतला होता.

त्याच वेळी शिवा न्हावी शिवरायांचे रूप घेऊन गडावर इतर भागात जाऊन सैन्याची देखभाल करत होते. तेव्हा राजे व शिवा न्हावी याच्यांत काहीच फरक वाटत नव्हता .मुसळधार पावसाची तीरात्र होती. छत्रपती शिवरायांनी निवडक ६०० मावळे हत्यारबंद बरोबर घेतले. त्याच्यांबरोबर बाजीप्रभू देशपांडे होते . या फौजेसह सदर--महालातूनजड अंत : करणाने  राजदिंडी मार्गानेमहाराज बाहेर पडले . त्यावेळी दोन पालख्या निघाल्या .एका पालखीत खुद्द शिवाजी महाराज होते व दुसऱ्या पालखीत शिवरायांच्यासारखा दिसणारा शिवा न्हावी होता .शिवाजी शरण येणार या अविर्भावात सिद्दीचेसैन्य होते.

मात्र महाराजांची पालखी आडवाटेने विशाळगडी चालली होती .वेढा फोडून काही अंतर गेल्यावर सिद्दी जोहरच्या सैन्याला चाहूल लागली. त्यांनी पालखीचा पाठलाग केला .मात्र मावळे जिवाची पर्वा न करता जलदगतीने पावले टाकत सही सलामत महाराजांना गडावर पोहचविण्यासाठी धडपडत होते. महाराज निसटून गेल्याची बातमी सिद्दी जोहरला समजली त्यांनी जलद गतीने पाठलाग केला .त्यावेळी सिद्दीच्या सैनिकांना शिवा न्हावी बसलेली पालखी छत्रपती शिवाजी राजे समजून पकडून आणली .

मार्ग :

पन्हाळा (राजदिंडी)तुरुकवाडी-म्हाळूंगे-मसाई पठार -  कुंभारवाडी - चाफेवाडीमांडलोईवाडीकरपेवाडी - आंबेवाडी - माळेवाडी -  माजवाड - पांढरे पाणी - गजापूर या मार्गाने महाराज विशाळगडी पोहचले. मार्च १६६० मध्ये महाराज पन्हाळगडावर आले होते आणि १२ जुलै १६६० रोजीते विशाळगडास पोहचले. एवढा कालावधी शिवराय पन्हाळा गडावर होते . शिवरायांना ओळखणारा फक्त रुस्तमजमान हा सरदार होता .त्याला सिद्दी जोहार ने ताबडतोब बोलावून घेतले .रुस्तमजमान येताच त्याच्यापुढे पकडून आणलेली पालखी नेण्यातआली .

त्यांने त्या पालखीकडे पाहिले विचारले . " आप शिवाजीराजे ? हा मै शिवाजी असे उत्तर शिवा काशिद म्हणताच ,रुस्तम जमाने सांगितले यहतो नकली शिवाजी है I असली सोना आसानी से नही मिलेगा I सिद्दी जोहारच्या सैनिकांनी नकली शिवाजी जेरबंद करून भाल्याने भोसकले . हे वार झेलत असताना शिवा न्हावी बोलला, ' शिवाजीचं सोंग घेतलं तरी हा शिवाजी मरताना कधीच जमिनीस पाठ लावणार नाही ' .

राजाचा आवडता हेर :

नकली शिवाजीस भाल्याने भोसकले , तेव्हा राजे शिवाजी हा माझा अखेरचा मुजरा . ' माझं खरं नाव शिवा काशीद असून मी राजांचा आवडता हेर ' असे उद्गागार शिवा काशिद ने काढले . शिवा काशिद निधन पावताच त्याचे प्रेत वाडा इमारतीतून  नेबापूरच्या पश्चिमेस जंगलात नेण्यात आले . तेथे त्याची विल्हेवाट लावली आज तेथे फक्त पाऊल खुणा शिल्लक दिसतात .शिवा काशीचे वंशज सांगतात की ,आमच्या घराण्यात सव्हेंनं .४७ चाहिस्सा एकूण जमीन १७ गुंठे आहे .आम्हास फार पुरातन काळपासून 'न्हावकी'या नावाने आम्हास इनाम देणगी मिळाली आहे .

प्रत्येक वर्षीविजया दशमीस नेबापूर - शिवापूर - गुरुवार पेठ - पन्हाळा येथे सिमोल्लंघनहोते . शिवा काशिद याच्या थडग्यानजीक असलेल्या जांभ्या दगडावर सोने वाहून नंतर इतरांना द्यायचे . प्रथम नैवेद्य त्यांच्या थडग्यास दाखवला जातो .  सादोबा यात्रेमध्ये मानाचा विडा -  नारळ - आवतेन (निमंत्रण ) देण्याचे काम शिवा काशीदच्या वंशजांना मिळते. शिवा काशीद याची समाधी पन्हाळगडाचेभूषण असून स्फूर्तिस्थान आहे .समाधीवर "शिवा न्हावी" अशी अक्षरे आहेत . ही समाधी शिसे धातूपासून बनवलेली आहे . पन्हाळगडाच्या च्या प्रवेश प्रवेशद्वारापाशी कै .रविंद्र मेस्त्री यांनी बनवलेला हा नऊ फूट उंचीचा पुतळा .आजही शौर्याची गाथा सांगत अभिमानाने उभा आहे.

डॉ .उमा उत्तम पाटील

इतिहास विभाग प्रमुख

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry