MENU

 

४ नोव्हेंबर गणितज्ञ शकुंतलादेवी जन्मदिनानिमित्त त्यांची ओळख

४ नोव्हेंबर गणितज्ञ शकुंतलादेवी जन्मदिनानिमित्त त्यांची ओळख

 

जेष्ठ गणितज्ञ शकुंतलादेवी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.मानवी संगणकअसे नामाभिधान प्राप्त करणाऱ्या गणितज्ञ शकुंतलादेवी या अतिशय कठीण गणितीय आकडेमोडी क्षणार्धात करीत असत. बालपणीच सर्वज्ञता वरी तयांतेया वर्णनाची आठवण व्हावी अशी गणिती प्रतिभा आकडय़ांशी लीलया खेळणाऱ्या शकुंतलादेवींकडे होती. मानवी संगणकअसे त्यांना म्हटले जाई, एवढे त्यांचे आकडेमोडीवर प्रभुत्व होते.

मोठमोठ्या संख्यांचे गुणाकार, भागाकार आदी गणिती क्रिया त्या चटकन् करत. पण अचंबित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे शालेय शिक्षणही झालेले नव्हते. एका कानडी गरीब, ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मंदिरातील पुजारी न बनता त्यांच्या वडिलांनी सर्कस मधील कलावंत म्हणून जगण्याचे ठरवले होते. उंच झुल्यांवरील कसरतींबरोबरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पत्त्यांचे जादूचे प्रयोगही ते करत असत. आपल्या मुलीची स्मरणशक्ती चांगली आहे हे त्यांनी ओळखले होते. हातचलाखीने ते जादू करत, पण त्यांची मुलगी शकुंतला केवळ स्मरणाने सर्व पत्ते बरोबर सांगत असे. त्यामुळे वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांनी तिला मदतीला घेणे सुरू केले.

गणनक्रियेतील तिची सहजता आणि अचूकता प्रेक्षकांना अचंबित करीत असे. थोडय़ाच अवधीत तिच्या गणिती कौशल्याची प्रसिद्धी सर्वत्र होऊ लागली. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी म्हैसूर विद्यापीठात पहिला जाहीर कार्यक्रम करून गणनाच्या कौशल्याने सर्वाना थक्क केले.

शकुंतलादेवी यांच्या गणिती कौशल्याबद्दल अनेकांनी शंका घेतल्या पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. १९७७ मध्ये त्यांनी २०१ अंक असलेल्या आकडय़ाचे २३वे मूळ काढले होते. १८ जून १९८० रोजी लंडन येथील इम्पीरियल कॉलेजमध्ये त्यांचा एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्या कॉलेज मधील संगणक विभागातील प्राध्यापकांनी दोन तेरा अंकी संख्यांचा गुणाकार त्यांना करण्यास सांगितले. त्या संख्या अशा :

,६८६,३६९,७७४,८७० x

,४६५,०९९,७४५,७७९

या गुणाकाराचे अचूक उत्तर त्यांनी केवळ २८ सेकंदांत दिले होते. १९९५ च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली आहे. त्यावेळी लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये संगणकाने अंदाजाने निवडलेल्या या संख्यांचा गुणाकार करून त्यांनी सर्वाना चकित केले.

२०१ अंकी संख्येचे २३ वे मूळ !

x x x x २... अशा प्रकारे २ ही संख्या २३ वेळा घेऊन गुणाकार केला तर उत्तर ८३८८६०८येते. ही ७ अंकी संख्या आहे. हे गणिती भाषेत २ चा २३ वा घात ८३८८६०८असे सांगितले जाते, किंवा ८३८८६०८ या ७ अंकी संख्येचे २३ वे मूळ २ आहे,’ असे म्हटले जाते.

शकुंतलादेवींना एका कार्यक्रमात पुढील प्रदीर्घ संख्या देण्यात आली होती. तीत एकूण २०१ अंक आहेत. या संख्येचे २३ वे मूळ काढण्यास त्यांना सांगितले गेले. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी केवळ ५० सेकंदांत दिले. त्यांच्या या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली आहे. ती संख्या अशी :

 

९१६७४८६७६९२००३९१५८०९८६६०९२७५८५३८०१६२४८३१०६६८०१४४३०८६२२४०७१२६५१६४२७९३४६५७०४०८६७०९६५९३२७९२०५७६७४८०८०६७९००२२७८३०१६३५४९२४८५२३८०३३५७४५३१६९३५१११९०३५९६५७७५४७३४००७५६८१६८८३०५६२०८२१०१६१२९१३२८४५५६४८०५७८०१५८८०६७७१

आपल्याला बुद्धिदात्या गणेशाच्या कृपेने ही दैवी देणगीप्राप्त झाली असे त्या सांगत. सततच्या कार्यक्रमांनी त्यात अधिकाधिक सफाई येत गेली आणि अनेक विक्रम नोंदवले गेले.

फन विथ नंबर्स, अ‍ॅस्ट्रॉलॉजी फॉर यू, पझल्स टू पझल यू, मॅथाब्लिट ही त्यांची पुस्तके विशेष गाजली होती. गेल्या शतकातील कुठल्याही तारखेला कुठला वार होता हे ते क्षणार्धात सांगत असत. सर्वसामान्यांना सहज समजेल आणि गणिताची गोडी वाढेल असे कार्यक्रम त्या करीत असत. कोणत्याही तारखेचा वार क्षणार्धात सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. कित्येक विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, गृहिणी त्यांना आपल्या जन्मतारखेचा वार सांगण्याची विनंती करत आणि त्या त्याचे अचूक उत्तर ताबडतोब देत असत. हे कार्यक्रम बघायला मोठमोठय़ा व्यक्ती येत. त्यांच्या घरातील फोटो अल्बममध्ये अशा मोठय़ा व्यक्तींबरोबर त्यांचे काढलेले अनेक फोटो आहेत. त्यात माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सारखे शास्त्रज्ञ, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, हिलरी क्लिंटन, सचिन तेंडुलकर, कपिलदेव अशा अनेक मान्यवर व्यक्ती आहेत. पझल्स टू पझल यू, फन विथ नंबर्स, इन् द वंडरलॅण्ड ऑफ नंबर्सही त्यांची आणखी काही उत्तम पुस्तके.

कोडी सोडविण्याच्या छंदातून गणिताची गोडी लागते आणि गणिती कौशल्यही विकसित होत जाते असे त्या सांगत. सर्वाना, विशेषत: मुलांना गणिताची गोडी लागावी आणि त्यांना गणिताचा आनंद उपभोगता यावा यासाठी त्या प्रयत्न करीत. गणिती विश्वविद्यालय काढण्याचे त्यांचे स्वप्न होते. ज्योतिष जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी 'अ‍ॅस्ट्रॉलॉजी फार यूहे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.  शकुंतलादेवी यांचे २१ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry